अंबाजोगाई: शहरातील प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. बाळासाहेब हाके यांच्या वैद्यकीय कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला आहे. देशातील आघाडीच्या टाईम्स ऑफ इंडिया समूहाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘हीलिंग इंडिया फोरम अवॉर्ड २०२६’ अंतर्गत ‘हीलर ऑफ द इयर’ या मानाच्या पुरस्कारासाठी त्यांचे नाव नामांकित करण्यात आले आहे.

गेल्या १५ वर्षांपासून डॉ. हाके अंबाजोगाई आणि लातूर येथे रुग्णसेवा देत आहेत. त्यांचे ‘सोरायसिस हीलिंग सेंटर’ या दुर्धर त्वचारोगावरील उपचारासाठी ओळखले जाते. केवळ उपचारच नाही तर या आजाराबद्दल समाजात जनजागृती निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. देशभरातून हजारो डॉक्टरांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यातून निवड प्रक्रियेत महाराष्ट्रातून मोजक्याच डॉक्टरांची निवड झाली असून त्यात डॉ. हाके यांचा समावेश आहे. त्यांच्या या यशामुळे अंबाजोगाईच्या नावलौकिकात भर पडली आहे. हजारो सोरायसिस रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याची दखल म्हणून हे नामांकन मिळाले आहे. या नामांकनामुळे वैद्यकीय वर्तुळातून त्यांचे कौतुक होत असून सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...