⚠️ कॉपीराईट सूचना

बीड न्युज एक्सप्रेस या वेबसाईटवरील मजकूर जशास तसा कॉपी करणे अथवा शब्द बदलून अथवा AI द्वारे पुनर्लेखन करून स्वतःच्या नावाने प्रसिद्ध करणे किंवा याचा वापर करणे तसेच फोटो वापरणे हा कॉपीराईट कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. असे आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- ॲड आदमाने/ॲड मुंडे (कायदे सल्लागार, बीड न्युज एक्सप्रेस)

गौतम बचुटे/केज: दुष्काळी परिस्थितीत चार एकर अद्रक जोपासली – उत्पादक शेतकरी कैलास जाधव युवा शेतकऱ्याची यशोगाथा – पाऊणकोटी रु चे उत्पन्न मिळण्याची शक्यता

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ज्या भागात सिंचनाचे शाश्वत साधन नाही, त्या भागात शेती करणे सोपे नाही. कधीकधी दुष्काळ पडतो आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जाते पण या आव्हानात्मक परिस्थितीत सुद्धा, एका युवा शेतकऱ्याने आपल्या मेहनतीने आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीला एका फायदेशीर व्यवसायात बदलले आहे. केज तालुक्यातील साळेगाव येथील शेतकरी कैलास जाधव पाटील यांनी त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी पैकी चार एकर क्षेत्रात अद्रक लागवड करून दुष्काळी भागातील शेतकऱ्या समोर एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी पारंपरिक आणि बारमाही पिकांच्या ऐवजी कमी मेहनत आणि जास्त उत्पन्न देणारे पीक लागवड करून त्याला ठिबक सिंचन आणि योग्य मात्रेत खत आणि आंतरमशागत करून वेगळा प्रयोग केला आहे.

उसा ऐवजी अद्रक लागवड

कैलास जाधव यांच्या कुटुंबात तिघा भावांची एकूण ४५ एकर जमीन आहे. पूर्वी ते उसाची लागवड करत असत, परंतु ऊसाला बारमाही पाणी लागते. तसेच त्याचा मिळणारा भाव यामुळे त्यांनी पीक पद्धती आणि पीक बदलण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी त्यांनी २०२० मध्ये त्यांनी थोड्या क्षेत्रात अद्रक लागवड सुरू केली होती.

ठिबक सिंचन आणि सौर ऊर्जेचा केला उपयोग


पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी जाधव यांनी त्यांच्या शेतात एक विहीर आणि दोन बोअरवेल आहेत. या शिवाय, १६ एकर जमिनीवर ठिबक सिंचन प्रणाली बसवण्यात आली आहे. यामुळे पाण्याची बचत होते आणि पिकांना आवश्यक पाणी मिळेल याची खात्री होते. २०२४ मध्ये, त्यांनी सरकारी कृषी योजने अंतर्गत आपल्या शेतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला. यासाठी त्यांना ९० टक्के अनुदान मिळाले. तसेच, त्यांना ठिबक सिंचनासाठी कृषी विभागाकडून ४० टक्के अनुदानही मिळाले. यामुळे विजेचा खर्च आणि शेतीचा खर्च कमी होण्यास मदत झाली.

५०० क्विंटल अद्रकचे उत्पादन अपेक्षित

कैलाश जाधव यांनी १ जून २०२६ रोजी ४ एकर जमिनीवर अद्रकची पेरणी केली. यावर्षी कमी पावसामुळे त्यांना सुमारे ५०० क्विंटल उत्पन्नाची अपेक्षा आहे. त्यांनी बियाणे, पेरणी आणि शेतजमिनीच्या तयारीवर अंदाजे २.५ ते ३ लाख रुपये खर्च केले. सध्या अद्रकचा बाजारभाव प्रति क्विंटल सुमारे १७,००० रुपये असण्याचा अंदाज आहे. या पिकाची काढणी जानेवारी ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान होईल.

“जर शेतकऱ्यांनी पाणी वाचवण्याचे तंत्र अवलंबले आणि पिकांमध्ये बदल केले, तर कठीण परिस्थितीतही शेतीला एक फायदेशीर व्यवसाय बनवता येऊ शकते.”

-शेतकरी कैलास जाधव पाटील, साळेगाव

Pratik Tarkase is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...