विश्वजीत गंडले/परळी वै.– सामाजिक क्रांतीबरोबरच धम्म क्रांतीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या परळी वैजनाथ येथील भीमनगर, यजगतकर गल्ली व प्रबुद्ध नगर येथील सुगंध कुटी बुद्ध विहारात मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वर्षावासाची सांगता रवीवारी (दि. २५) पौर्णिमेचे औचित्य साधून करण्यात आली.

या निमित्त सुगंध कुटी बुद्ध विहार, भीमनगर येथून भव्य धम्म रॅलीचे आयोजन करून समस्त परळीकरांचे लक्ष वेधून घेतले. शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करून येथील बौद्ध अनुयायी या रॅलीत सहभागी झाले होते. सुगंध कुटी बुद्ध विहारापासून प्रारंभ झालेली ही रॅली रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत काढण्यात आली.या प्रसंगी पूज्य भदंत डॉ. एस. आर. धम्मदीपजी महाथेरो, पू. भिक्खू सुभद्र, पू. भिक्खुनी रुपनंदाजी, पू. भिक्खुनी शिलरक्षिता, भि. अय्याजी संबोधी, अय्याजी संघमित्रा, अय्याजी वैशाली, भि. सुबोधी, पू. पारमिता, पू. संबोधी यांची उपस्थिती होती.

यावेळी पूज्य भन्तेंना कठिन समजले जाणारे चिवर प्रदान करण्यात आले. तसेच धम्मदेसना या प्रसंगी संपन्न झाली.जनकल्याण महिला मंडळ, वर्षावास उत्सव समिती, भीमनगर येथील बौद्ध उपासक, उपासिका, युवक-युवती, बालक-बालिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वर्षावासा निमित्त येथील परिसर धम्ममय झाला आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...