गौतम बचुटे/केज: केज तालुक्यातून एका सालगड्याच्या अविवाहित मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एक कुटुंब मागील तीन महिन्यांपासून केज तालुक्यातील महादू गायकवाड यांच्या शेतात सालगडी म्हणून कामासाठी आले आहे. या कुटुंबात सालगडी, त्यांची पत्नी, सून, लहान मुलगा आणि २१ वर्षीय अविवाहित मुलगी आहे. दिनांक २४ ऑक्टोबर रोजी रात्री सर्व कुटुंब जेवण करून झोपले होते. त्यानंतर दिनांक २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ३:३० वाजण्याच्या सुमारास सालगड्याने झोपेतून उठून पाहिले असता, त्यांची मुलगी घरात नसल्याचे निदर्शनास आले. कुटुंबाने आजूबाजूला शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही.

अपहरण झालेल्या मुलीचे वय २१ वर्षे असून, रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट आहे. ती बेपत्ता झाली तेव्हा तिच्या अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट होती. तिचे शिक्षण इयत्ता ९ वी पर्यंत झाले असून तिला मराठी भाषा बोलता येते.

पोलीस तपास सुरू

या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६८१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४० (३) नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस त्या मुलीचा शोध घेत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...