विश्वजीत गंडले/घाटनांदुर: अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापुर फाटा येथे पैशाच्या वादातून कार अडवून चालकाला मारहाण करत कारसह ६ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील ताकडगाव येथील वाहन चालक महादेव नारायण यादव हे त्यांची फोर्ड इकोस्पोर्ट कार क्रमांक एमएच २२ एएम ३५३४ घेऊन अंबाजोगाईकडे जात असताना बर्दापुर फाटा येथे चांगतपुरी ता. पैठण जि. संभाजीनगर येथील कृष्णा कारभारी काळे, सचिन कारभारी काळे आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदाराने मोटारसायकल आडवी घालून त्यांची कार अडवली.

पैशाच्या देवाण घेवाणीच्या कारणावरून फिर्यादीस कारमधून खाली उतरवून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच फिर्यादीच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा ६९ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोडून नुकसान केले व त्यांची ६ लाख ११ हजार रुपये किमतीची कार आणि ४५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ६ लाख ८४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन आरोपी पसार झाले. पैसे परत मागितले असता पैसे देत नाही जिवे मारून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी बर्दापुर पोलिस ठाण्यात तीघाविरुद्ध गुन्हा दाखल झालाअसून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दीराने व जाऊने सोयाबीनचा ढीग जाळला……..

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.