विश्वजीत गंडले/घाटनांदुर: अंबाजोगाई तालुक्यातील भारज येथे दररोज दारू पिऊन घरी येतोस व शिवीगाळ करतोस या कारणावरून पत्नी आणि मुलगा यांनी संगनमत करून पतीला मारहाण केल्याची घटना २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घडली.

फिर्यादी सिद्राम विश्वनाथ जाधव (वय ४८, रा. भारज) यांच्या तक्रारीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८९/२०२६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार आरोपी पत्नी लता सिद्राम जाधव आणि मुलगा विश्वजीत सिद्राम जाधव यांनी तू दररोज दारू पिऊन घरी का येतोस असे म्हणून वाद घातला. आरोपींनी वेळूच्या काठीने पाठीवर व मानेवर मारहाण करून जखमी करुन हाताबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी सिद्राम विश्वनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरुन बर्दापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोह भाजीभाकरे हे करत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...