अंबाजोगाई – येथील जुन्या पिढीतील आदर्श शिक्षक म्हणून परिचित असलेले जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक संजीवनराव तुळशीराम सूर्यवंशी (ठाकूर) (वय ८४) यांचे गुरुवारी, दि. २९ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अंबाजोगाई शहरातील शिक्षक वर्ग, जुने विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. सेवानिवृत्त शिक्षक म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी घडवले. शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील प्रसिद्ध प्रेस फोटोग्राफर नरेंद्र ठाकूर आणि सुरेंद्र ठाकूर यांचे ते वडील होत.त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी बोरुळ तलाव येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्र परिवार आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
