एकाविरुद्ध धारूर पोलिसांत गुन्हा दाखल
धारूर (प्रतिनिधी):
सार्वजनिक बोअरवरून पाणी भरण्याच्या किरकोळ कारणावरून धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धावडी येथे पाणी पुरवठ्याचे सरकारी कामकाज करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत फिर्यादीचा एक दात पडल्याने तो गंभीर जखमी झाला असून, आरोपीविरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धावडी (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील रहिवासी नागनाथ ज्ञानोबा केंद्रे (वय ३७ वर्षे, व्यवसाय: नोकरी) हे २८ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५:०० ते ५:३० वाजेच्या सुमारास गावातील सार्वजनिक बोअरवर पाणी पुरवठ्याचे शासकीय कामकाज पाहत होते. यावेळी तिथे उपस्थित असलेला आरोपी धम्मानंद अच्युत तरकसे (रा. धावडी, ता. अंबाजोगाई) याने सार्वजनिक बोअरवरून पाणी भरण्याच्या कारणावरून वाद उकरून काढला. आरोपीने फिर्यादी नागनाथ केंद्रे यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व चापटाने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, शासकीय कर्तव्य बजावत असताना सरकारी कामात अडथळा निर्माण करून आरोपीने दगडाने फिर्यादीच्या तोंडावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादीचा एक दात तुटून गंभीर दुखापत झाली असून आरोपीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी जखमी नागनाथ केंद्रे यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यात आरोपी धम्मानंद अच्युत तरकसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडे करत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...