अंबाजोगाई/प्रतिनिधी:
अंबाजोगाई तालुक्यातील धावडी येथे भीषण पाणीटंचाईने आता मुक्या जीवांवरही संकट आणले आहे. गावातील ऐतिहासिक लांडगदरा तलावासह चारही तलाव पहिल्यांदाच पूर्णपणे आटले आहेत. त्याचा परिणाम आता थेट दिसू लागला आहे.

Beed News Express च्या हाती आलेला हा EXCLUSIVE फोटो धावडी येथीलच आहे. यामध्ये एक भुकेलेला आणि तहानलेला कुत्रा एका जुन्या निळ्या ड्रममध्ये तोंड घालून पाण्याचा एक थेंब शोधताना दिसत आहे. आजूबाजूला सर्वत्र सुकलेला पालापाचोळा आणि कोरडी जमीन दिसते, जी या दुष्काळाची भीषणता दाखवते. गावात माणसांना कसेबसे पाणी मिळत असले तरी मुक्या प्राण्यांची आबाळ होत आहे. तलाव, ओढे, नाले सर्व कोरडे पडल्याने चिमण्या, कावळे, कुत्रे, मांजरे यांना पिण्यासाठी पाणी मिळेना. त्यामुळे ते मानवी वस्तीत येऊन घरासमोर ठेवलेल्या ड्रम, बादल्या आणि कुंड्यांमध्ये पाणी शोधत आहेत.

       हळहळ व्यक्त
हा हृदयद्रावक फोटो पाहून अनेक ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली आहे. गावकऱ्यांची मागणी आहे की प्रशासनाने फक्त माणसांसाठीच नाही तर मुक्या जीवांसाठीही गावात ठिकठिकाणी छोटे पाणवठे आणि पाण्याच्या टाक्या ठेवाव्यात. वन विभाग आणि ग्रामपंचायतीने मिळून तातडीने पाऊल उचलले तर या मुक्या जीवांचे हाल थांबतील. हा फोटो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून धावडीच्या दुष्काळाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...