उत्तम आरोग्य आणि आर्थिक समृद्धीवर मार्गदर्शन
अंबाजोगाई/प्रतिनिधी:
ग्लोबल एक्सपँशन टीम (G.E.T.) च्या वतीने अंबाजोगाई येथे आगामी ११ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी’ (HOM) या विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. उत्तम आरोग्य, जीवनशैलीतील सकारात्मक बदल आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सौ. सारिका व श्री. विश्वास तट उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. ‘उत्तम आरोग्य, उज्ज्वल भविष्य’ या संकल्पनेवर आधारित या परिसंवादात सकस आहार, ऊर्जावान जीवनशैली, आरोग्य सुधारणा, व्यक्तिगत विकास आणि आर्थिक स्वावलंबन या विषयांवर सविस्तर माहिती दिली जाणार आहे.आरोग्यसंपन्न आणि समृद्ध समाज घडवण्याच्या उद्देशाने आयोजित या महत्त्वपूर्ण सत्राचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन विलास तट (94207 83588, 98341 97362 ) यांच्या सह आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील:
* दिनांक: ११ ऑक्टोबर २०२६
* वेळ: दुपारी १२:३० ते ०१:०० (सत्र),
दुपारी ०१:०० ते ०४:०० (प्रशिक्षण सत्र)
* स्थळ: कांचन वेलनेस सेंटर, हॉटेल साई पॅलेस, परळी रोड, अंबाजोगाई – ४३१५१७
