धारूर / प्रतिनिधी:
आडस येथील आठवडी बाजारात मेंढी विकण्यासाठी आलेल्या एका इसमाची दुचाकी अज्ञाताने हँड लॉक तोडून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होळ येथील रहिवासी महादेव दत्तु तारडे (वय ३१ वर्षे, व्यवसाय: मेंढी पालन) हे दिनांक ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ०९:३० ते १०:३० वाजेच्या सुमारास आडस (ता. केज, जि. बीड) येथील आठवडी बाजारात मेंढी विकण्यासाठी आले होते. त्यांनी आपली हिरो कंपनीची जुनी वापरती मोटारसायकल (पासिंग क्र. MH 44 R 4725) बाजारात पार्क केली होती. दरम्यान, एका अज्ञात चोराने या दुचाकीचे हँड लॉक तोडून ती चोरून नेली. या चोरीला गेलेल्या मोटारसायकलची अंदाजे किंमत २०,००० रुपये इतकी आहे. याप्रकरणी फिर्यादी महादेव तारडे यांच्या तक्रारीवरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार नरवणे करत आहेत