परळी वैजनाथ (विश्वजीत गंडले): परळी वैजनाथ शहरातील गांधी मार्केटमधील ‘अजय कलेक्शन’ या रेडिमेड कपड्याच्या दुकानात झालेल्या 10 लाख रुपयांच्या चोरीचा छडा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) लावला आहे. या प्रकरणी आंतरराज्यीय टोळीतील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 71 हजार 400 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दिनांक 10 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 2 ते 2.30 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी गांधी मार्केटमधील अजय कलेक्शन दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील सुमारे 10 लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम लांबवली होती. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक 218/2026 दाखल करण्यात आला होता.
LCB ने अशी लावली जाळी
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून LCB पथकाने समांतर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून 14 ऑक्टोबर रोजी पाटोदा येथे छापा टाकून मुख्य आरोपी अकबर लुकमान खान (32, रा. जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून संपूर्ण टोळीचा पर्दाफाश झाला.
अटक आणि फरार आरोपी
अटकेतील आरोपी:
- अकबर लुकमान खान (32, प्रिंपाळा हुडको, जळगाव)
- परवेज मेहमूद सय्यद (22, भोसले आखाडा, अहिल्यानगर)
फरार आरोपी:
3. मोईन बादशाह शेख (मुकुंदनगर, अहिल्यानगर)
4. अशपाक सबीर खान (लोहारा, पाचोरा, जळगाव)
आरोपींकडून 500 रुपयांच्या 142 नोटा आणि 100 रुपयांच्या 4 नोटा असे एकूण 71,400 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
राजस्थान कनेक्शन उघड
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीचा राजस्थानमधील अजमेर येथील गंज पोलीस ठाणे (गु.र.नं. 213/2026) आणि आदर्शनगर पोलीस ठाणे (गु.र.नं. 206/2026) येथील चोरीच्या गुन्ह्यांशी थेट संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातून आणखी मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. शिवाजी बंटेवाड, पीएसआय सुशांत सुतळे, हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, विकास राठोड, सचिन आंधळे, विकी सुरवसे

