अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील शेतकरी अंकुश रंगनाथ गंगणे (वय ६४) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गंगणे यांच्या नावे सुमारे एक हेक्टर शेती आहे. ही जमीन माळरानावर असल्याने यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने पिके हाती आली नाहीत. गेल्या हंगामापासून सततच्या नापिकीमुळे ते आर्थिक विवंचनेत होते, […]

