विश्वजीत गंडले/घाटनांदुर: घाटनांदूर पासून जवळच असलेल्या परळी वैजनाथ तालुक्यातील आनंदवाडी शिवारातील लाडझरी येथे शेतातील ऊसाला आग लागल्याची घटना दि. 17 रोजी दुपारच्या सुमारास घडली.शेतकरी रंजना धर्मराज कांदे यांच्या मालकीच्या गट नं. 40 आणि 41 मधील चार एकर बारा गुंठे क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.घटनेची माहिती मिळताच बिट […]
