विश्वजीत गंडले/घाटनांदुर: घाटनांदूर पासून जवळच असलेल्या परळी वैजनाथ तालुक्यातील आनंदवाडी शिवारातील लाडझरी येथे शेतातील ऊसाला आग लागल्याची घटना दि. 17 रोजी दुपारच्या सुमारास घडली.शेतकरी रंजना धर्मराज कांदे यांच्या मालकीच्या गट नं. 40 आणि 41 मधील चार एकर बारा गुंठे क्षेत्रातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे.

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.घटनेची माहिती मिळताच बिट अंमलदार पांडुरंग वाले, तलाठी भागवत भताने आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परळी नगर परिषदेची अग्निशमन गाडी बोलवण्यात आली होती. यावेळी लाडझरीचे सरपंच शिरीष नाकाडे, तसेच लाडझरी व आनंदवाडी येथील ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.दरम्यान, दुष्काळाच्या परिस्थितीत हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून, शासन स्तरावरून तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

व्हिडिओ बातमी

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.