गौतम बचुटे/केज:- केज-कळंब मार्गावर एसटी महामंडळाची पर्यावरण पूरक वातानुकूलित ई-बस सेवा सुरू झाल्याने सामान्य प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र याच ई-बसमध्ये विद्यार्थ्यांचा सवलतीचा पास ग्राह्य धरला जात नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि.१७) सकाळी ई-बस अडवून रस्त्यावरच ठिय्या आंदोलन केले. साळेगाव, माळेगाव, मांगवडगाव, शेलगाव गांजी, बोबडेवाडी, सुकळी, सातेफळ, हदगाव, […]
