केज, दि. २२ (प्रतिनिधी): केज तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. सारणी (आ.) येथील पुरुषोत्तमदादा सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता ११ वीचा विद्यार्थी चैतन्य माधव धपाटे याने विभागीय क्रीडा स्पर्धेत दुहेरी यश संपादन केले आहे.

गोळा फेक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले, तर थाळी फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक जिंकले.मूळचा भाटुंबा, ता. केज येथील रहिवासी असलेल्या चैतन्यने यापूर्वीच तालुका आणि जिल्हास्तरावर दोन्ही क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला होता. त्याच जोरावर त्याची लातूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची ही विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धा परभणी येथे पार पडली. या स्पर्धेत विभागातील अनेक नामांकित खेळाडू सहभागी झाले होते, मात्र चैतन्यने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.त्याच्या या घवघवीत यशामुळे आता त्याची थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे. राज्यस्तरावरही तो अशीच चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राहुल सोनवणे, माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चैतन्यचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...