गौतम बचुटे / केज: सध्या पडलेल्या भीषण दुष्काळाने शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. हाताला काम नसल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले हे गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष एम. एस. नंदा आणि युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या विशेष प्रयत्नातून राज्यासाठी किराणा साहित्याचे १०० ट्रक पाठवण्यात आले आहेत. या साहित्याचे जिल्ह्यात वितरण सुरू झाले आहे.तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, होळ सर्कल मधील शेतकरी, शेतमजूर, अनाथ, गरीब, विधवा आणि दिव्यांग कुटुंबांना हे किराणा किट देण्यात येणार आहे.या कार्यक्रमास जेष्ठ नेते दिलीप बनसोडे, जिल्हा संघटक रवींद्र जोगदंड, तालुका सरचिटणीस गौतम बचुटे, सुरज काळे, निलेश ढोबळे, प्रशांत हजारे यांच्यासह रिपाइंचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी होणार वाटप

याचाच एक भाग म्हणून शनिवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी केज तालुक्यातील होळ येथे गरजू कुटुंबांना रेशन किटचे वाटप करण्यात येणार आहे. रिपाइं तालुकाध्यक्ष दीपक भाऊ कांबळे यांच्या हस्ते हा वितरण कार्यक्रम होणार आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...