गौतम बचुटे/केज :- केज शहरातून एका १८ वर्षीय तरुणीचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास केज शहरातील एका भागातून १२ वी चे शिक्षण घेत असलेली १८ वर्षे ४ महिने वयाची तरुणी बेपत्ता झाली. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध (गु.र.नं. ५७६/२०२६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बजरंग मुंडे हे करीत आहेत.
सदर तरुणीसंदर्भात कोणाला काही माहिती मिळाल्यास केज पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
