ङि सदानंद/अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपड्या आणि पत्र्याच्या शेडवर प्रशासनाचा बुलडोझर फिरत आहे. रस्ते मोकळे होत आहेत हे खरे, पण त्याचबरोबर अनेक गरीब कुटुंबांचे संसार मात्र अक्षरशः रस्त्यावर आले आहेत.
कारवाई दरम्यान अनेक ठिकाणी हृदयद्रावक दृश्ये पाहायला मिळाली. ज्या पत्र्याच्या शेडमध्ये एखाद्या कुटुंबाचा चूल-मूल, लेकराबाळांचा संसार होता, तेच शेड काही मिनिटांत जमीनदोस्त झाले. घरातील वृद्ध, महिला आणि लहान मुले हताशपणे आपले मोडके सामान गोळा करताना दिसत होती. डोक्यावरचे छप्पर गेले, रात्रीच्या जेवणाचीही सोय नाही, अशी अवस्था या कुटुंबांची झाली आहे.प्रशासनाची जबाबदारी आणि माणुसकीचा प्रश्नरस्ते मोकळे करणे, वाहतूक सुरळीत करणे ही प्रशासनाची जबाबदारीच आहे. त्याबद्दल दुमत नाही.
माणुसकीचा विसर
मात्र, ही कारवाई करताना माणुसकी जपली जात आहे का? हा खरा प्रश्न आहे.ज्यांची घरे पाडली, त्यांनी जायचे कुठे? या थंडीत वृद्धांनी आणि चिमुकल्यांनी आसरा कुठे शोधायचा? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.केवळ बुलडोझर फिरवून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही. बेघर झालेल्या या कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत ठोस पावले उचलणेही तितकेच गरजेचे आहे. त्यांना पर्यायी जागा किंवा तात्पुरता निवारा देण्याचा विचार व्हायला हवा.या कठीण प्रसंगात शहरातील सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आणि सेवाभावी संघटनांनी पुढे येऊन या कुटुंबांना तात्पुरता निवारा, अन्नधान्य आणि कपड्यांची मदत करण्याची गरज आहे.रस्ते मोकळे झाले, पण या गरीबांच्या आयुष्यात आलेला अंधार दूर करण्यासाठी मदतीचा हात कोण देणार?
