गौतम बचुटे/केज: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.ए.एम.एस. फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, डॉ. दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, बोरपाडले, कोल्हापूर येथील विद्यार्थिनी कु. ऋतुजा शिवदास मुंडे हिने घवघवीत यश संपादन केले आहे.

ऋतुजा हिने प्रथम वर्षात ६९ टक्के, द्वितीय वर्षात ७० टक्के आणि अंतिम वर्षात २५५० पैकी १७४९ गुण मिळवत ६८.५८ टक्के गुणांसह सातत्यपूर्ण यश राखले आहे. केवळ वैद्यकीय शिक्षणातच नव्हे, तर वक्तृत्व क्षेत्रातही तिने आपला ठसा उमटवला आहे. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये तिने प्रथम क्रमांक पटकावत फिरती ढाल, फिरता चषक आणि अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत. ऋतुजा मुंडे ही ज्येष्ठ पत्रकार शिवदास मुंडे आणि शिवसेना महिला आघाडी (शिंदे गट) च्या संपर्क प्रमुख रत्नमाला मुंडे यांची कन्या आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

आयुर्वेद उपचार पद्धतीचा प्रसार करून आरोग्य क्षेत्रात वेगळे करिअर घडवण्याचा आपला मानस असल्याचे ऋतुजा हिने सांगितले. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला दिले आहे.

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...