अंबाजोगाई (प्रतिनिधी): चनई शिवारातील आसद यांच्या विटभट्टीजवळ जुन्या वादाच्या कारणावरून एका ४९ वर्षीय शेतकऱ्याला अडवून लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता घडली आहे.

जखमी शेतकरी योगीराज शेषेराव गडकर (वय ४९, रा. राजेवाडी, ता. अंबाजोगाई) हे दुचाकीवरून जात असताना आरोपींनी त्यांची गाडी आडवी लावली. “जिवे मारतो” अशी धमकी देत पाठीवर, हात-पायावर आणि पोटावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गु.रं.नं. ४४०/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश मोतीराम काचगुंडे, मोतीराम बापुराव काचगुंडे (दोन्ही रा. राजेवाडी) आणि एक अनोळखी इसम यांच्या विरुध्द अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार भागवत करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी बीड न्युज एक्सप्रेस वाचत रहा..

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...