बीड – जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बळीराजाच्या हक्कासाठी शेतकरी हक्क मोर्चा कायम आक्रमक राहिला आहे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय होईल तिथे आमचे कार्यकर्ते उभे राहतील, हीच आमची भूमिका असल्याचे शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकऱ्यांचा भव्य जन आक्रोश दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला बीडच्या शेतकरी हक्क मोर्चाने सक्रिय सहभाग नोंदवत जाहीर पाठिंबा दिला.ज्या वेळी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यातील शेतीचे प्रश्न मांडण्यात आले. जिल्ह्यातील अनेक बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत, अशा बँकांवर कठोर कारवाई करावी. तसेच 2020 ते 2025 पर्यंतचा रखडलेला पीक विमा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा आणि दुष्काळी अनुदानाची संपूर्ण रक्कम तातडीने वितरित करावी, अशी मागणी राजेंद्र आमटे यांनी केली. या आंदोलनात राजेंद्र आमटे यांच्यासह रामधन जमाले, हनुमान घोडके, खाजा पठाण, दीपक जाधव, उमेश मस्के, विलास शिरसाट आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

