अंबाजोगाई /प्रतिनिधी:
शहर परिसरातील फार्म ट्रॅक ट्रॅक्टर शोरूमसमोर ३० सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या एका रस्ता अपघातात एक ६२ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी १६ ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई येथील फार्म ट्रॅक ट्रॅक्टर शोरूमसमोर ३० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. तुषार हनुमंत मुळे (वय ३२, रा. माकेगाव, ता. अंबाजोगाई) यांचे वडील हनुमंत अप्पाराव मुळे (वय ६२, रा. माकेगाव) यांना सुमित विलास केंद्र (रा. अंबाजोगाई) याने आपल्या ताब्यातील मोटारसायकल (क्रमांक MH 44 AF 0434) भरधाव वेगात, हयगयीने व निष्काळजीपणे चालवून जोरदार धडक दिली. या अपघातात हनुमंत मुळे यांच्या उजव्या मांडीचे हाड फॅक्चर होऊन मांडीच्या जॉईंटचा बॉल मोडला असून पाय फॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झालया प्रकरणी तुषार मुळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात सुमित केंद्र याच्याविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ४४५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गुट्टे करत आहेत.
अंबाजोगाईत भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी; चालकाविरोधात गुन्हा दाखल
