धारूर (प्रतिनिधी): धारूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आसरडोह येथील तलावातील विहिरीवर लावण्यात आलेले पाणीपुरवठ्याचे ४५ हजार रुपये किमतीचे केबल वायर अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून ते १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या दरम्यान ही चोरी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीतील मोटारीचे वायर चोरट्यांनी कापून नेले आहे.

मुद्देमाल चोरीस गेला?
या चोरीत एकूण २,००० फूट वायर चोरीला गेला आहे.
१) ग्रामपंचायत केकानवाडी अंतर्गत – १,००० फूट वायर (किंमत २५,००० रु.)
२) ग्रामपंचायत आसरडोह अंतर्गत – १,००० फूट वायर (किंमत २०,००० रु.)
असा एकूण ४५,००० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे.

पोलिसात गुन्हा दाखल
या प्रकरणी केकानवाडी येथील पाणीपुरवठा कर्मचारी मुरलीधर माणिक चाटे (वय ४५, रा. केकानवाडी, ता. केज) यांनी धारूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्र. ४२०/२०२६ नुसार BNS कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह. मोरे हे करत आहेत.


G. Ravi Dharur is a correspondent from Dharur taluka, Beed district, with 15+ years of experience in rural journalism. He covers Dharur for Beed News Express, focusing on farming, local development, and...