आंबेजोगाई / प्रतिनिधी : शेतकऱ्यांना रासायनिक खतांची सुलभ आणि पारदर्शक उपलब्धता व्हावी यासाठी आंबेजोगाई तालुक्यात दि. २२ ऑक्टोबर २०२६ पासून Framework for Fertilizer Sale (FFS) प्रणाली लागू होत आहे.या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खतासाठी दुकानात रांगा लावण्याची गरज राहणार नाही. शेतकरी मोबाईलवरूनच उपलब्ध खत पाहून गरजेनुसार ऑनलाइन बुकिंग करू शकणार आहेत. यामुळे अनधिकृत साठवणूक, कृत्रिम टंचाई आणि काळाबाजाराला आळा बसणार आहे.
FFS चा वापर कसा करावा
1)Play Store वरून Framework for Fertilizer Sale (FFS) App डाउनलोड करा.
2) आधार किंवा Farmer ID ने लॉगिन करा.
3) आपला सर्वे नंबर व पिकाची माहिती निवडा.
4) आवश्यक खत निवडून बुकिंग करा.
4) बुकिंगनंतर मिळालेला QR Code घेऊन विक्रेत्याकडे जा.
महत्त्वाचे: सोबत दिलेला हा QR Code ७२ तासांसाठीच वैध राहील. मुदत संपल्यास पुन्हा बुकिंग करावी लागेल.अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, आंबेजोगाई येथील गुणनियंत्रण अधिकारी श्री. सुरेश ढाकणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
