अंबाजोगाई-: (प्रतिनिधी)–
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील प्रख्यात नेत्र चिकित्सक डॉ. एकनाथ शेळके यांना मराठवाडा जनविकास परीषद पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा “मराठवाडा भुषण पुरस्कार” जाहीर झाला असून येत्या मराठवाडा मुक्ती सन्ग्राम दिनी (17 सप्टेंबर) रोजी पुणे येथे एका जाहीर कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

या सन्दर्भात मराठवाडा जनविकास प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या मराठवाडा समन्वय समिती, पुणे यांच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याचे कळवण्यात आले असून सदरील पूरस्कार स्विकारण्यासाठीची विनती करण्यात आली आहे. मराठवाडा जनविकास प्रतिष्ठान ही संस्था सन २००९ पासून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी पुणे येथे ‘मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव’ आयोजित करत आहे. यावर्षी हा कार्यक्रम १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायं. ६.०० ते ९.०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय येथे कार्यरत असणारे प्रख्यात नेत्र तज्ञ डॉ. एकनाथ शेळके यांना या सन्दर्भात दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, “नेत्ररोग चिकित्सा आणि सामाजिक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात केलेले कार्य अत्यंत मोलाचे व प्रेरणादायी आहे. सन २००७ पासून शासकीय वैद्यकीय सेवेत कार्यरत राहून आपण हजारो रुग्णांची तपासणी, उपचार व नेत्रशस्त्रक्रिया केल्या आहेत. ग्रामीण भागात मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शिबिरांच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना नवी दृष्टी देण्याचे कार्य आपण केले आहे. सामाजिक बांधिलकीतून सातत्याने रुग्णसेवा करण्याचा आपला हा प्रवास गौरवास्पद आहे. त्यामुळेच यंदाच्या सामाजिक क्षेत्रातील ‘मराठवाडा भूषण पुरस्कारासाठी’ आपली निवड करण्यात आलेली आहे.
आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारावा, ही आमची नम्र व आस्थेपूर्ण विनंती आहे. आपल्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिक प्रेरणादायी ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.
सदरील विनंती पत्रावर प्रतिष्ठान चे सचीव दत्ताजी मेहत्रे आणि अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांची स्वाक्षरी आहे. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी अधिष्ठाता तथा डॉ. एकनाथ शेळके यांचे गुरु डॉ. भास्कर खैरे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शन्कर धपाटे, पद्मश्री डॉ. शकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख,
मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, डॉ. सतीष गिरेबोईनवाड, डॉ. महेश कदम, नेत्र विभाग प्रमुख डॉ. ज्ञानोबा दराडे, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेगिन्ग प्रतिबंधक समितीचे सदस्य सुदर्शन रापतवार, अन्कुश गित्ते व इतरांनी अभिनंदन केले आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *