अंबाजोगाई/प्रतिनिधी: आंबा साखर कारखान्याजवळ असलेल्या टोल नाक्यापासून अवघ्या काही अंतरावर दुकान पुलाच्या बाजूला रस्त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून डांबरीकरण उखडल्याने वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्याची झालेली दुरवस्था वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता असून अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे. टोल वसुली होत असतानाही रस्त्याची अशी अवस्था का, असा प्रश्न वाहनचालकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागाने या रस्त्याची पाहणी करून तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *