बीड/ प्रतिनिधी:
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा प्रशासनाने अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. अंबाजोगाई शहरातील कुख्यात दारूमाफिया किशोर बाबुराव जाधव (वय ३९, रा. चनई, ता. अंबाजोगाई) याच्यावर एमपीडीए (MPDA) कायद्यान्वये स्थानबद्धतेची कठोर कारवाई करून त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
वारंवार कारवाई करूनही सुधारणा नाही आरोपी किशोर जाधव याच्याविरुद्ध गावठी हातभट्टीची दारू तयार करणे, वाहतूक करणे आणि विक्री करणे यांसारखे मद्यनिषेध कायद्यांतर्गत तब्बल ६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी १६ ऑगस्ट २०२५ रोजी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती; मात्र तरीही त्याने अवैध धंदे सुरूच ठेवल्याने अंबाजोगाई शहर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध MPDA अंतर्गत प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला बीडचे जिल्हाधिकारी मा. श्री. विवेक जॉन्सन यांनी मंजुरी दिली.
कारवाईतील पोलीस पथक
पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, सहायक पोलीस अधीक्षक श्री. ऋषिकेश शिंदे आणि एलसीबी पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
यात अंबाजोगाई शहरचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोउपनि आनंद शिंदे, रमेश घुले, श्रीकृष्ण वडकर, मंगेश भोले, अनिल डोंगरे, संतोष गाडे, हनुमंत चादर, भागवत नागरगोजे, महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) सपोउपनि अभिमन्यू औताडे, सचिन सानप, सचिन आंधळे, रामचंद्र केकाण, गोविंद भताने, बबन सलगर व बिबीषण चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीस अधीक्षकांचा कडक इशारा
“सण-उत्सवाच्या काळात शांतता भंग करणाऱ्या, वाळू व गुटखा माफिया, अवैध जुगार, हातभट्टी चालवणारे तसेच खंडणीखोर व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर यापुढेही थेट MPDA आणि MCOCA (मोक्का) अंतर्गत कारवाई केली जाईल.”
— श्री. नवनीत कॉवत (IPS), पोलीस अधीक्षक, बीड
