विश्वजीत गंडले/घाटनांदूर: अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर नगरीत प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्याच्या मध्येच मोठ्या प्रमाणात खडी आणि दगड-गोटे टाकून काम अर्धवट सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरून पायी चालणेही कठीण झाले आहे. अंबाजोगाई-अहमदपूर राज्य महामार्ग क्रमांक 548 ड वरून घाटनांदूर नगरीत प्रवेश करणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे […]
