अंबाजोगाई : येथील संत गाडगेबाब सेवाभावी संस्थांतर्गत आधार माणुसकीच्या उपक्रमातर्फे शनिवारी (दि.७) बीडचे जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांच्या हस्ते बीडसह इतर जिल्ह्यातील ११०० गरीब व गरजू कुटुंबांना दिवाळीचा फराळ व माहेरची साडी भेट देण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता बीड रोडवरील विवान्स सायली मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर […]
