विश्वजीत गंडले/घाटनांदुर: बीड जिल्ह्यात सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दुष्काळ निवारण व जलसंधारणाची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, बीड अंतर्गत विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-G RAM G) च्या माध्यमातून हा आदेश (जा.क्र.२०२६/VB-G RAMG/आदेश/कावि-136, दिनांक ०४.११.२०२६) सर्व गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ग्राम रोजगार सेवकांना देण्यात आला आहे.जलतारा हे मुख्य कामया मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने ‘जलतारा’ हे काम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.

जलतारा हे मुख्य काम

या मोहिमेअंतर्गत प्रामुख्याने ‘जलतारा’ हे काम जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे.

अ.क्र.ग्रामपंचायत सदस्य संख्यानिश्चित उद्दिष्ट
1725
2930
31135
41340
51550
61750

तीन टप्प्यांमध्ये काम पूर्ण होणार

जिल्ह्यातील एकूण कामे तीन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.टप्पा 1: 19 नोव्हेंबर 2026 ते 25 नोव्हेंबर 2026 – उद्दिष्ट 29,725टप्पा 2: 26 नोव्हेंबर 2026 ते 02 डिसेंबर 2026 – उद्दिष्ट 29,725टप्पा 3: 03 डिसेंबर 2026 ते 09 डिसेंबर 2026 – उद्दिष्ट 29,725. एकूण 89,175 कामे या कालावधीत पूर्ण करण्याचे लक्ष्य प्रशासनासमोर आहे.

अंमलबजावणीबाबत महत्त्वाच्या सूचना

  1. जलतारा हे काम वैयक्तिक लाभाचे असून शक्यतो एका कुटुंबास एक याप्रमाणे द्यावे आणि त्यावर त्याच कुटुंबातील सदस्याला मजूर म्हणून घ्यावे.

2. जलसंधारणाच्या दृष्टीने शेततळे, नाला खोलीकरण, नाला सरळीकरण, सलग समतल चर (CCT), माती नाला बांध, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण अशी कामे नियमानुसार हाती घ्यावीत.

3. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून विहित वेळेत उद्दिष्टपूर्ती करावी, कामात कोणतीही दिरंगाई होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे.

सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा जिल्हाधिकारी बीड यांनी दिले आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...