केज/प्रतिनिधी:केज शहरातील कळंब रोडवरील माउली टॉकीजच्या पाठीमागे राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या घरी पहाटेच्या सुमारास अज्ञात तीन भामट्यांनी दरोडा टाकून सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज शहरातील नबी बशीर शेख (वय ७५ वर्षे, रा. माउली टॉकीजच्या पाठीमागे, कळंब रोड, केज, जि. बीड) हे आपल्या कुटुंबासह राहतात. […]
