केज/प्रतिनिधी:
केज शहरातील कळंब रोडवरील माउली टॉकीजच्या पाठीमागे राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या घरी पहाटेच्या सुमारास अज्ञात तीन भामट्यांनी दरोडा टाकून सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज शहरातील नबी बशीर शेख (वय ७५ वर्षे, रा. माउली टॉकीजच्या पाठीमागे, कळंब रोड, केज, जि. बीड) हे आपल्या कुटुंबासह राहतात. दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे ०४:०० ते ०४:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांच्या घराच्या लाकडी दरवाजाचे कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरात घुसून चोरट्यांनी १५ ग्रॅम वजनाचे, सुमारे ७५,००० रुपये किमतीचे जुने वापरते सोन्याचे मणी-मंगळसूत्र चोरून नेले. या घटनेनंतर नबी बशीर शेख यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६६४/२०२६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) शेख करत आहेत.
