परळी वैजनाथ (प्रतिनिधी)परळी येथील जुने थर्मल परिसरात अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत ५७ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. पांडुरंग संतराम वाघमारे (वय ५७, रा. शिवाजीनगर, परळी वै.) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी […]
