वडवणी: वडवणी शहरातील मध्यवर्ती असलेल्या साठे चौकात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरण्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बसने प्रवास करणाऱ्या ग्रामीण महिलांमध्ये घबराट पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठळबन येथील ६० वर्षीय महिला सुभाबाई पांडुरंग मुंडे या आपल्या मुलीसह बीडच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी जात होत्या. २५ ऑक्टोबर रोजी दुपारी […]
