गौतम बचुटे/केज: केज शहरात मागील तीन दिवसात दोन महिला आणि एका पुरुषाचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल त्रिंबक सोपने आणि बजरंग मुंडे हे करत आहेत.

पहिली घटना – ३ सप्टेंबर:

केज शहरातील एका भागात ३५ वर्षीय विवाहित महिला, जी दोन मुलांची आई आहे, तिचा पती कामानिमित्त पुण्याला गेला असताना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. याबाबत तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना – १३ सप्टेंबर:

केज-बीड रोडवरील एका हॉटेल समोरील दुध डेअरीवर दूध आणण्यासाठी गेलेली १९ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता झाली आहे. सकाळी ७ वाजता गेलेली तरुणी परत न आल्याने तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे.

तिसरी घटना – १२ सप्टेंबर:

कळंब रोडवरील पाण्याच्या प्लांटवर काम करणारा ३२ वर्षीय विवाहित तरुण अजिम महेबुब सय्यद (रा. कळंब रोड, केज) हा कामावर गेल्यानंतर घरी परतला नाही. त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तीन दिवसात घडलेल्या या तीन घटनांमुळे केज शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमधून भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता काही माहिती असल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *