जिल्हा निर्मिती, विमानतळ आणि रेल्वेची मागणी

अंबाजोगाई/प्रतिनिधी:अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक, धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असूनही विकासापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे अंबाजोगाईच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करणे ही काळाची गरज बनली आहे, असे ठाम प्रतिपादन समाजवादी पार्टीचे चर्मकार सेल प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवाजी कांबळे यांनी केले.

अंबाजोगाई तालुका हा कायम दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. धनेगाव येथील मांजरा धरण भरले तरी तालुक्यातील अनेक भागात पाण्याची टंचाई भासते. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून धनेगाव मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून अंबाजोगाई तालुक्यातील सर्व छोट्या-मोठ्या नद्या एकमेकांना जोडून त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करणे अत्यावश्यक आहे. जर नदीजोड प्रकल्प झाला तर भविष्यात दुष्काळ परिस्थितीत नागरिकांना चारा, पाणी व अन्नाचा तुटवडा भासणार नाही.

या आहेत 17 प्रमुख मागण्या


अंबाजोगाई शहराचा विकास व्हावा यासाठी त्यांनी शासनाकडे 17 मागण्यांचे निवेदन दिले आहे. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात तज्ञ डॉक्टरांची नेमणूक, बुटेनाथ तलावाची निर्मिती, काळवटी धरणाची उंची वाढवणे, नवीन एमआयडीसी उभारून तरुणांना रोजगार देणे, शैक्षणिक हब उभा करणे, शेतकऱ्यांसाठी नवीन बाजार समिती आणि सेंद्रिय शेतीला वेगळा भाव, घाटनांदूर ते अंबाजोगाई रेल्वे मार्ग, बुटेनाथ येथे हजारो एकर जमिनीवर विमानतळ, पर्यटनासाठी उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे उपकेंद्र, सांस्कृतिक सभागृह, महिला बचत गटासाठी विक्री केंद्र, बंद पडलेल्या जि.प. शाळा वाचवणे आणि बंद कारखाने सुरू करणे या मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी अॅड. कांबळे यांनी दिला.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *