गौतम बचुटे/केज:
तालुक्यातील कुंबेफळ येथे बैलपोळ्याच्या मिरवणुकीत विना परवाना डीजे वाजविल्या प्रकरणी युसुफवडगाव पोलिसांनी कारवाई केली आहे.
प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस कर्मचारी कोकाटे आणि गायकवाड यांनी 10 सप्टेंबर रोजी ही कारवाई केली. धारूर तालुक्यातील चोरांबा येथील छावा 99+ चोरांबेवाला हा डीजे विना परवाना आणि आवाज मर्यादेचे उल्लंघन करून वाजवत होता.पोलिसांनी आयशर टेम्पो MH 04 GC 2446 ताब्यात घेतला असून मूळ बनावटीत बदल केल्याने RTO ला कारवाईसाठी पत्र दिले आहे.
