छत्रपती संभाजीनगर: पदवीधर मतदारसंघाच्या राजकारणातून मोठी उलथापालथ समोर आली आहे. गेली 18 वर्षे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे आ. सतीश चव्हाण यांना मतदारांनी सत्तेतून खाली खेचले आहे. हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नसून, एका कार्यपद्धतीचा पराभव असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सुरुवातीला सतीश चव्हाण यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्यांच्याकडे सत्ता होती, पैसा होता, अनुभवी कार्यकर्त्यांचे जाळे होते आणि प्रचाराची भलीमोठी यंत्रणा होती. मात्र प्रत्यक्ष मतपेटीतून वेगळेच चित्र बाहेर आले. मतदारांनी पैशाची मस्ती आणि अहंकाराला नाकारत बदलाला कौल दिला.

पराभवामागे तीन मुख्य कारणे

परावरचे मुख्य कारणे नागरिक सांगतात. पहिले म्हणजे पदवीधरांच्या मूळ प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष. सुशिक्षित बेरोजगार, शिक्षकांचे प्रश्न, नोकऱ्यांचे प्रश्न यावर ठोस काम न झाल्याने पदवीधरांमध्ये प्रचंड नाराजी होती. दुसरे कारण म्हणजे महायुतीतील अंतर्गत बंड. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट, आमदार अब्दुल सत्तार आणि आमदार प्रशांत बंब यांनी उघडपणे विरोधात प्रचार केल्याने चव्हाण यांची कोंडी झाली.

तिसरे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे प्रचारातील नियोजनाचा अभाव. जालन्यात लावलेल्या बॅनरवर बीड जिल्ह्यातील प्रभावी ओबीसी नेत्या पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे फोटो वगळण्यात आल्याने बीडमधील पदवीधर मतदार दुखावले गेले. या छोट्या वाटणाऱ्या चुकीने मोठा फटका दिला.

दुसरीकडे प्रतापसिंह पाटील यांच्याकडे अनुभव कमी असला तरी अचूक नियोजन होते. त्यामुळे नवा चेहरा म्हणून मतदारांनी त्यांना स्वीकारले.

या निकालाने एकच संदेश दिला आहे की, मतदारांना गृहीत धरून चालणार नाही. पाच वर्षे काम करावेच लागेल.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...