विश्वजीत गंडले/घाटनांदुर: अंबाजोगाई तालुक्यातील व घाटनांदुर पासून जवळच असलेल्या तळेगाव घाट येथील जि.प.उ.प्रा.शाळेची विद्यार्थिनी कु. श्रावणी सुभाष घोडके हिने तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या इस्रो नासा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिला 53 गुण मिळाले आहेत.

तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या विज्ञान व अवकाश ज्ञानावर आधारित या परीक्षेत अंबाजोगाई तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये तळेगाव घाटच्या श्रावणीने बाजी मारत प्रथम क्रमांकावर निवड होण्याचा बहुमान मिळवला आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून, ग्रामीण भागातून तिने मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे. तिच्या या यशामुळे तळेगाव घाट गावासह अंबाजोगाई तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अंबाजोगाई तालुका – निवड झालेले पहिले 10 गुणवंत विद्यार्थी :

  1. श्रावणी सुभाष घोडके – जि.प.प्रा.शा. तळेगाव (घाट) – 53 गुण
  2. रुद्र माणिक वाघमारे – जि.प.प्रा.शा. पठाण मांडवा – 48 गुण
  3. वेदांत रामदास धायगुडे – जि.प.प्रा.शा. पिंपळा धायगुडा – 47 गुण
  4. क्रांती अनंत सोनटक्के – जि.प.प्रा.शा. पूस – 46 गुण
  5. विराट संजय चौधरी – जि.प.प्रा.शा. चनई – 45 गुण
  6. सोहम संजय कोंडेकर – जि.प.प्रा.शा. पूस – 45 गुण
  7. विवेक धनराज गोचडे – जि.प.प्रा.शा. चनई – 45 गुण
  8. प्रतिक्षा गणेश थोरात – जि.प.प्रा.शा. कुंभेफळ – 45 गुण
  9. पुष्पा ईश्वर फड – जि.प.प्रा.शा. खापरटोन – 44 गुण
  10. सिद्धी अशोक गंगणे – जि.प.मा.शा. राडी – 44 गुण

या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा. या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे पाठबळ तसेच जि.प.शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

Vishwajit Ganadale, Ghatanandur Correspondent with 25 years of experience in journalism. Covering politics, rural development and ground reports from Ghatanandur and Beed district.