आडस व धावडी शिवारात चोरांचा हैदोस! सोलारच्या 49,500 च्या वायरी लंपास
धारूर: केज तालुक्यातील आडस व धावडी शिवारात चोरट्यांनी हैदोस घातला असून शेतकऱ्यांच्या सोलार पंपाच्या वायरी चोरून येण्याच्या घटना वाढल्या आहेत.
याबत सविस्तर माहिती अशी की,आडस येथील शेतकरी सत्यप्रेम राजेभाऊ ढोले (वय 41) यांनी आपल्या शेतात सोलार युनिट बसवले होते. मंगळवार, 2 सप्टेंबरच्या मध्यरात्री 2:00 ते सकाळी 8:00 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतात प्रवेश करून सोलार पंपासाठी बसवलेली सुमारे 49,500 रुपये किमतीची केबल शिताफीने कापून चोरून नेली. सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता वायर चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी धारूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून धारूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 303(2) अन्वये गु.र.नं. 365/2026 दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत. शिवारात रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
परिसरातील गावात चोरांचे लक्ष
******************
तसेच आडस जवळच असलेल्या धावडी, केंद्रेवाडी व परिसरातील गावात चोरांनी आपला मोर्चा वळवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी सावध करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
