अंबाजोगाई (प्रतिनिधी): पु.भिक्खु धम्मशील थेरो यांच्या 14 व्या वर्षावास समापनानिमित्त ऐतिहासिक भव्य कठीण चिवर दानोत्सव व भिक्खु संघ दान सोहळ्याचे आयोजन 1 नोव्हेंबर रोजी अंबाजोगाई येथे करण्यात आले आहे.वर्षावास काळात पुज्य भिक्खु संघाने केलेल्या सध्दम्म चिंतन, ध्यान, साधना आणि लोककल्याणाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे.

बौद्ध परंपरेतील सर्वोत्तम दानाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून पुण्य अर्जित करावे, असे आवाहन पंचशील बुद्ध विहार महिला उपासिका संघ, जयभीम नगर, आरकनगर, समतानगर, सम्राट नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, विद्युत नगर व सर्व बौद्ध उपासक-उपासिका यांच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यास सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय भिक्खु संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पु.भिक्खु डॉ. उपगुप्त महाथेरो (पुर्णा) यांच्या हस्ते होणार आहे, तर अध्यक्षस्थानी पु.भिक्खु प्रा.डॉ. खेमधम्मो महाथेरो (मुळावा) हे राहणार आहेत.प्रमुख धम्मदेसनासाठी पु.भिक्खू शरणानंद महाथेरो (पाथरी), पु.भदंत डॉ. विपश्यनाचार्य सुमनवन्न महाथेरो (चंद्रपूर), पु.भदंत डॉ. इंदवंस्स महाथेरो (छ.संभाजीनगर), पु.भदंत डॉ. ज्ञानरक्षित महाथेरो (छ.संभाजीनगर), पु.भिक्खु धम्मबोधी थेरो, पु.भिक्खु महाविरो (काळेगाव), पु.भिक्खु विपश्यनाचार्य पय्यारत्न थेरो (नांदेड), पु.भिक्खु पय्याबोधी थेरो, पु.भिक्खु पय्यानंद थेरो (लातूर), पु.भिक्खु रेवतबोधी थेरो, पु.भिक्खु एस. नागसेन (खरोसा लेणी) आदी उपस्थित राहणार आहेत.तसेच पु.भिक्खु पय्यातिस्सा महाथेरो (जवळा फकीर), पु.भिक्खु सुभुती थेरो, पु.भिक्खु संघप्रिय थेरो, पु.भिक्खु धम्मसार थेरो (किल्लारी), पु.भिक्खु चंद्रमुनी (हिंगोली), पु.भिक्खु धम्मघोष, पु.भिक्खु बुद्धभूषण, पु.भिक्खु पय्यावर्धन, पु.भिक्खु नागसेन बोधी (उदगीर), पु.भिक्खु पय्यारक्खीत (पुणे) आदी भिक्खु संघ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

धम्म रॅली व सांस्कृतिक कार्यक्रम

रविवार, दि. 1 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 8 वाजता पंचशील बुद्ध विहार, जयभीम नगर येथे धम्म ध्वजारोहण होईल. सकाळी 8:30 वाजता जयभीम नगर येथून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह सवाद्य लेझीम पथकासह भव्य धम्म मिरवणुकीस प्रारंभ होईल.ही मिरवणूक पंचशील बुद्ध विहार – यशवंतराव चव्हाण चौक – माता रमाई चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक मार्गे अनिकेत मंगल कार्यालय येथे पोहोचेल.त्यानंतर भीमशाहीर अमोल तरकसे व संच यांचा बुद्ध व भीम गीतांचा प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...