गाैतम बचुटे/केज: केज तालुक्यातील साळेगाव शिवारात केज-कळंब रोडवरील शरीफ शेख फरीद बाबा दर्ग्याजवळ तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली. हा अपघात दिनांक 27 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडला.

या प्रकरणातील फिर्यादी अभिषेक राजेंद्र शेळके (वय 20 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर व मजुरी, राहणार हिवरा पहाडी तालुका जिल्हा बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते दत्त शिरूळ कारखान्याकडे केज-कळंब रोडने जात असताना त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या काळ्या रंगाच्या इकोस्पोर्ट कंपनीच्या कारने हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवले.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, इकोस्पोर्ट कार क्रमांक एमएच 25 एएस 2333 च्या चालकाने फिर्यादीच्या वाहनाला पाठीमागून पुढे जाताना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने या कारने ट्रॅक्टरच्या उजव्या बाजूच्या मोठ्या चाकावर जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ट्रॅक्टरच्या हौसिंगचे नुकसान होऊन त्याचे दोन भाग झाले.अपघातानंतर आरोपीची इकोस्पोर्ट गाडी रस्त्याच्या मधोमध आल्यामुळे पाठीमागून भरधाव वेगात येणारी वॅगनार गाडी क्रमांक एमएच 44 झेड 5684 ही येऊन थेट इकोस्पोर्टवर आदळली. या धडकेमुळे वॅगनार गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या घटनेप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात दिनांक 29/10/2026 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 683/2026, कलम 281, 125, 324 (4) बीएनएस अन्वये इकोस्पोर्ट गाडी क्रमांक एमएच 25 एएस 2333 च्या चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार दराडे हे करीत आहेत.

अपघाताची बातमी वाचा…..

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...