बर्दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून भरदिवसा 1 लाख 25 हजार रुपये किमतीचा शासकीय संगणक संच चोरीला गेला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

विश्वजीत गंडले/घाटनांदुर:

दिनांक 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ऑल इन वन पीसी, माऊस आणि किबोर्डसह असलेला संच आरोपी बंडू जोगदंड (रा. बर्दापूर) याने चोरून नेल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. रंगनाथ आदनाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात (गु.र.नं. 243/2026) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ह. चेवले करत आहेत.

शासकीय आरोग्य केंद्रातूनच संगणक लंपास झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *