अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथील शेतकरी अंकुश रंगनाथ गंगणे (वय ६४) यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गंगणे यांच्या नावे सुमारे एक हेक्टर शेती आहे. ही जमीन माळरानावर असल्याने यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने पिके हाती आली नाहीत. गेल्या हंगामापासून सततच्या नापिकीमुळे ते आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.या घटनेमुळे गंगणे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार उघड्यावर पडला आहे.घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी पोलीस पाटील आणि तलाठी यांना कल्पना दिली. याबाबत अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी बीड न्युज एक्सप्रेस वाचत रहा..

