अंबाजोगाई: शहरातील परळी वेस परिसरात एका ३० वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना १७ ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला आणि तिच्या पतीमध्ये कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होते. पती दारूच्या व्यसनाधीन असल्याने घरात सतत वादावादी होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने राहत्या घरात आत्महत्या केली. घटनेनंतर तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी मयत महिलेच्या काकांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले करत आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...