गौतम बचुटे/केज: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथे दुष्काळाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. रात्रंदिवस मेहनत करून लावलेली एक एकर टोमॅटोची बाग पाण्याअभावी डोळ्यादेखत करपून गेल्याने हताश झालेल्या बाप-लेकाने आपल्या हाताने जोपासलेले पीक उपटून फेकून दिले आहे.

साळेगाव येथील ४० वर्षीय तरुण शेतकरी बाळासाहेब कल्याण गित्ते यांनी वडिलोपार्जित एक एकर शेतात टोमॅटोची लागवड केली होती. चांगली मशागत, खुरपणी, फवारणी आणि बांबूला तार बांधून बाग उभी केली होती. टोमॅटोला चांगला भाव असल्याने यातून ४ ते ५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल अशी आशा होती.मात्र यंदा पाऊस कमी पडल्याने ऐन बहरात आलेली बाग सुकू लागली. फळे पूर्ण वाढण्यापूर्वीच कोमेजून गेली. आज पाऊस पडेल, उद्या पडेल या आशेवर बाग जगवली, पण शेवटी पाण्याअभावी संपूर्ण बाग करपून गेली.अखेर दु:खी मनाने बाळासाहेब गित्ते आणि त्यांचे वडील कल्याण गित्ते या दोघांनी लहान मुलासारखी जपलेली बाग उपटून टाकली.कर्ज काढून केली होती लागवड बाळासाहेब गित्ते यांनी बँकेचे कर्ज काढून आणि औषध-खत उधारीवर घेऊन ही लागवड केली होती. आता पीक हातचे गेल्याने त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे.

कर्ज काढून केली होती लागवड

बाळासाहेब गित्ते यांनी बँकेचे कर्ज काढून आणि औषध-खत उधारीवर घेऊन ही लागवड केली होती. आता पीक हातचे गेल्याने त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे.

५ हजारात दिवाळी कशी करणार?

“मुख्यमंत्री फडणवीस यांनी ५ हजार रुपये मदत जाहीर केली आहे. त्यात लेकराबाळांना नवे कपडे आणि फराळ कसा होणार? त्यापेक्षा हेक्टरी १ लाख रुपये अनुदान दिले तर शेतकरी जगेल.” – बाळासाहेब गित्ते, शेतकरी

Gautamba Bachute is the District Crime Correspondent for Beed News Express, handling the most critical crime reporting for the district. With 25+ years of experience in field journalism, he is an expert...