गौतम बचुटे/केज:-

केज तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरिपाच्या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले असून प्राथमिक सर्वेक्षणानुसार सुमारे 85% उत्पादन घटल्याचा अंदाज आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदार भारत गंगावणे, गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे आणि तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी आणि पंचायत विभागाच्या पथकाने मंडळनिहाय संयुक्त पाहणी करून पंचनामा केला.

बीड जिल्ह्यात सर्वाधिक लागवड असलेले सोयाबीन पीक पाण्याअभावी करपून गेले आहे. कापूस, उडीद, मूग ही पिकेही क्षतिग्रस्त झाली आहेत. भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने शेतकरी आणि शेतमजूर संकटात सापडले आहेत.

चिंचोली मंडळातील साळेगाव येथे सरपंच कैलास जाधव, जय जोगदंड, पोलीस पाटील सुनील गालफाडे यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी मस्के, तलाठी शुभम गाडे, ग्रामसेवक दत्तात्रय लांडगे आणि कृषी सहाय्यक शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.bहा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *