Social

अंबाजोगाई/प्रतिनिधी:- अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवळा ते ममदापूर पाटोदा शिवारातील रस्त्यालगत असलेल्या सिद्धेश्वर रामराव देशमुख यांच्या शेतात अवैधरित्या चंदनाच्या लाकडाची तस्करी करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ही कारवाई दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास करण्यात आली. आरोपी राजकुमार हुबाजी गायकवाड, वय २६ वर्षे, रा. मुरुड, ता. जि. लातूर हा स्वतःच्या फायद्याकरिता विनापरवाना बेकायदेशीररित्या चोरी करून आणलेल्या चंदनाच्या झाडाच्या लाकडाचे तासकाम करत होता. तो लाकडातून मौल्यवान सुगंधित गाभा वेगळा करून त्याची चोरटी विक्री करण्याच्या तयारीत होता.याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, बीड येथील पोलीस हवालदार मारुती देवीदास कांबळे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस हवालदार मारुती कांबळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (रजि. नं. ३८४/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सिद्धेश्वर हे करत आहेत.

एकूण ६९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

या कारवाईत पोलिसांनी एकूण ६९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये २२ किलो ओली व वाळसर चंदनाची लाकडे तासून काढलेला सुगंधित गाभा, ज्याची किंमत ३,००० रुपये प्रति किलो प्रमाणे ६६,००० रुपये आहे. त्याचबरोबर गुन्ह्यासाठी वापरलेले साहित्य जसे की लाकडी दांडे असलेले दोन कुदळ, एक वाकस, एक लोखंडी किकर असा १४०० रुपयांचा ऐवज आणि वजन करण्यासाठी आणलेला एक साखळी असलेला वजन काटा, १ किलो, ५०० ग्रॅम, २०० ग्रॅम आणि १०० ग्रॅमचे बाट असा १००० रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. आहेत.

Pradeep Tatkare is the Founder & Editor-in-Chief of Beed News Express. A recipient of the prestigious Baba Dalvi Memorial Award, honored by Hon. Chief Minister Devendra Fadnavis for his outstanding...